Friday, February 26, 2010

Charolya

शांत स्तब्ध रात्र असते,
सोबती गार वार असतो
तुझ्या माझ्या गप्पांना,
साक्षी ध्रुव तारा असतो!!

काहीच बोलायला नसलं,
की तू खूप खूप रागावतेस
तुझी चूक तुलाच कळल्यावर,
हसून गोड लाजतेस!!

तुला पाहून क्षणभर वाटलं,
जणू आभाळ मनात दाटलं,
पहिल्या सरीत मी भिजलो,
अणि धुंदीत पुन्हा निजलो!!

मला नाही समजत तुझे
भेटायला इतक्या दूर येतेस,
आल्या आल्याच निघण्याची
तयारी करायला लागतेस!!!

सूर्य व्हायच्या ऐवजी मी,
दिवा होवून राहीन.....
कुठे तरी अंधाराला
जाळत विझून जाईन!!